चंद्रपूर :- जिल्ह्यात मागील दोन ते चार दिवसापासून सगळीकडे मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. नागभीड तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडली असून एक 13 वर्षाचा मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला. रुणाल बावणे याच मृतदेह काल दुपारी 3-4 वाजताच्या सुमारास आढळला. (व्हातसप्प रेपोटर)
नागभीड तालुक्यात विलम या गावामध्ये पूर आला होता. पूर पाहण्यासाठी रुणाल बावणे (वय 13 वर्षे) हा गावकऱ्यांसोबत नाल्यावरील पूलाकडे गेला होता. यावेळी पूल ओलांडत असताना त्याला पुलाच्या पाण्याची भान नव्हती त्यामुळे त्याच तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहात गावकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेला. गावातील काही तरुणांनी पाण्यात उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रुणाल बावणे याच मृतदेह काल दुपारी 3-4 वाजताच्या सुमारास आढळला. घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली.
(नोट : सविस्तर वृतात लवकरच )