Mul Murder: किरकोळ वादातून बाप व लेकाने कुऱ्हाडीने केली हत्या | Batmi Express

Be
0
Mul,Mul Crime,Mul News,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur Murder,Chandrapur News,
File Pic

मुल (21) : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील हळदी गावात झालेल्या किरकोळ वादातून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

ताज्या माहितीनुसार, शनिवारी 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सुमारास  हळदी गावात बाप गुरुदास पिपरे (48) आणि लेक सूरज गुरुदास पिपरे (21) हे घरातील झाडे तोडत होते. दरम्यान, शेजारी राहणारे राजू शेषराव बोदलकर (30) यांनी झाड तोडताना सूरज व गुरुदास यांना तार वाचवण्यास सांगितले. इतके आयकताच समजताच मुलगा सूरज व वडील गुरुदास यांनी राजू बोदलकर यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात राजूचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सूरज आणि गुरुदास यांना अटक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->