गडचिरोली: वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू | Batmi Express

Gadchiroli Lighting,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli Lighting Strike,Gadchiroli Batmya,Chamorshi,Chamorshi News,

Gadchiroli Lighting,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli Lighting Strike,Gadchiroli Batmya,Chamorshi,Chamorshi News,

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी पर्यंत) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज दिनांक- ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ,वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. 

अशातच आज सायंकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यात पावसा बरोबरच विजांचे कडकडाट होऊ लागले. अशातच चामोर्शी तालुक्यातील गोवर्धन गावातील गुरुदास गेडाम हे वैनगंगा नदीच्या काठावर लाकडी नाव बनवत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ते जागीच ठार झाले तर दुसऱ्या घटनेत शंकरपूर (हेटी) गावातील वैभव चौधरी यांच्यावरही वीज कोसळली. वीज कोसळल्या नंतर रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर तळोधी येथील नीळकंठ भोयर आणि लेकाजी नैताम हे वीज कोसळल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.