चंद्रपूर:- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात जादुटोणाच्या संशयावरून ( Witchcraft Black magic ) एका वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार समाेल आला आहे. आसाराम दोनाडकर (वय 67) असं मृत वृद्धाचे नाव आहे.
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव प्लॅन करून गेला. तू जादूटोणा करतो म्हणून त्यांच्याशी जमावाने वाद घातला. दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील झाली. त्यांना मारहाण हि बेशुद्ध होईपर्यंत झाली. काहींनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली.
या प्रकरणी पाेलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. यात संतोष जयघोष मैंद (वय 26), श्रीकांत जयघोष मैंद (वय 24), रुपेश देशमुख (वय 32) या संशियत आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.