Sex Racket: बारच्या तळघरात देहव्यापाराचा अड्डा, पोलिसांचा छापा | Batmi Express

Pawani,Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Crime,Bhandara News,Bhandara Today,Sex Racket,
Pawani,Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Crime,Bhandara News,Bhandara Today,Sex Racket,

पवनी(भंडारा) :- पवनी येथे हॉटेल विराज बारच्या तळघरात सुरू असलेल्या देह व्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला.येथे आढळलेल्या महिलेकडून देहव्यापार करवून अड्डा चालविणाऱ्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करीत मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल,शनिवारी दिनांक-१ जून रोजी करण्यात आली.रूपेश सूर्यभान शेंडे वय ३६ वर्षे,रा.चंडिकामाता मंदिर,शनिवारी वॉर्ड, पवनी असे अटक केलेल्याचे नाव आहे.

भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्तहेराकडून पवनी येथील कोरंभीकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल विराज बारच्या तळघरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. गुप्त माहिती वरून पोलिस पथक संबंधित ठिकाणी दाखल झाले. खात्री करण्यासाठी ठरल्याप्रमाणे पंटरला समोर पाठविण्यात आले.त्याने आत गेल्यावर ग्राहक म्हणून सौदा पक्का केल्यानंतर पोलिसांना फोनने माहिती दिली.पोलिस पथकाने हॉटेलच्या मागील बाजूच्या लोखंडी शिड्यांनी तळघरात प्रवेश केला. तेव्हा हॉललगत असलेल्या एका बंद रूममध्ये बनावट ग्राहक व पीडित महिला दिसून आली.

महिला पोलिस अधिकाऱ्याने तिची चौकशी केली. यावर तिने रूपेश शेंडे नावाच्या व्यक्तीने तिला येथे देहविक्री व्यवसायाकरिता आणले असून तो तिच्याद्वारे हा व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले.घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. रूपेश शेंडे याच्याविरूद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव पंजरवाड,प्रिती कुळमेथे व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.