Nagpur (Video) | ऑटोत शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपीला अटक | Batmi Express

Nagpur,crime in nagpur,crime Nagpur,Nagpur news,Nagpur Crime,Nagpur Molested,Molested,Nagpur Today,

Nagpur,crime in nagpur,crime Nagpur,Nagpur  news,Nagpur Crime,Nagpur Molested,Molested,Nagpur Today,
ऑटोत शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग - न्यूज फोटो 

नागपूर (Nagpur)
: राज्याच्या उपराजधानीत भरदिवसा एक ऑटोत दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा ऑटो चालकाने विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल आहे. विनयभंग करणाऱ्या ऑटोचालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नागपूरच्या ओमकार नगरमधील ग्रीन प्लॅनेट कॉलनी येथे दुपारी एका ऑटो चालकाने त्याच्या ऑटोमध्ये अल्पवयीन शाळकळी मुलीचा विनयभंग केल्याचे आढळून आले आहे. शाळा सुटल्यानंतर ही विद्यार्थिनी शाळेतून घराकडे निघालेली होती. अशातच शांत परिसर बघून या ऑटो चालकांना आधी ऑटो थांबविली आणि याच ऑटोमध्ये विद्यार्थिनीची छेड काढली.

एका स्थानिकाने या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याने हा प्रकार समोर आला अशातच त्या ऑटो चालकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या व्हिडिओच्या आधारे आरोपी ऑटो चालकाचा शोध घेण्यात पोलिसांना मदत मिळाली आहे. सध्या ऑटो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेची कारवाई करीत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी अतिशय घाबरली असून तिच्या आई-वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात नकार दिला. त्यामुळे आरोपीला प्रिव्हेंटिफ करून कदाचित आज त्याची सुटकाही होणार आहे.


घटनेचा विडियो बघा :  क्लिक टु प्ले विडियो

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.