ब्रम्हपुरी: कर्मवीर कन्नमवार कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथील इयत्ता बारावीच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम | Be Media

Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,HSC 2024 Exam,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Bramhapuri News,HSC 2024,HSC 2024 News,Chandrapur News,Chandrapur,

ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल काल, दिनांक- 21 मे रोजी ऑनलाईन अधिकृत संकेत स्थळावर दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा ब्रम्हपुरी तालुक्यातील कर्मवीर कन्नमवार कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा आजही कायम राखली आहे. शाळेचा निकाल 82.60 टक्के लागला असून विशेष म्हणजे आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे मुख्य संस्थापक स्व.दलित मित्र श्रीराम धोटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावात-परिसरात शिक्षण घेता यावे; याकरिता कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरबोडीची स्थापना केली.या कनिष्ठ महाविद्यालयातील कु.डिम्पल बंडू दुपारे हिने 77.34 टक्के 464 गुण मिळवून विद्यालयात कला शाखेतून प्रथम आली तर चेतन ताराचंद तलमले हा विधार्थी 406 गुण,67.67 टक्के घेऊन द्वितीय तर श्रद्धा आनंदराव सहारे हिने 393 गुण मिळवून 65.50 टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.विद्यालयातून एकूण 46 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य पिलारे सर तथा सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर, कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.