हार्दिक पांड्या ( Image Source :PTI )
T20 World Cup 2024, Hardik Pandya: IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या चर्चेचा विषय राहिला आहे. सध्याच्या मोसमात तो मुंबईचा कर्णधार म्हणून नेतृत्व करत आहे. मात्र, हार्दिकला सध्या तरी कर्णधार म्हणून मुंबई चाहत्यांचा पाठिंबा मिळालेला नाही. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमसह जवळपास प्रत्येक मैदानावर तो चाहत्यांच्या द्वेषाचा बळी ठरला आहे. दरम्यान, हार्दिकचा T20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघात समावेश करावा की नाही असा प्रश्न खूप वेगाने निर्माण होत आहे, जर तुम्ही हा लेख वाचत असाल तर कमेन्ट बॉक्स मध्ये तुमच मत आम्हाला नक्की कळवा.
जूनपासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्डकपात हार्दिकची निवड करायची की नाही, हा क्रिकेट तज्ज्ञ आणि दिग्गजांमध्ये मोठा प्रश्न आहे. वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून आयपीएल मधील हार्दिकचा फॉर्म स्कॅन केला जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पांढऱ्या चेंडूचा उपकर्णधार हार्दिकने आयपीएलच्या या हंगामात मुंबईसाठी 5 सामन्यात 129 धावा केल्या आहेत. बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने जुन्या शैलीत फलंदाजी करत 6 चेंडूत 21 धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला.
T20 वर्ल्डकपात निवड न होण्याचे कारण
दुखापतींनी अलीकडच्या काळात हार्दिक पांड्याला अधिक त्रास दिला आहे. दुखापती टाळण्यासाठी तो अनेकदा आपली गोलंदाजी कमी करताना दिसला आहे. गोलंदाजी कमी करून तो आपल्या कामाचा भार सांभाळतो. गोलंदाजीच्या कमतरतेमुळे हार्दिक ऑलराउंडर म्हणून दिसत नाही. IPL 2024 च्या पाच सामन्यांमध्ये हार्दिकने फक्त 8 षटके टाकली, ज्यामध्ये त्याला फक्त 1 विकेट मिळाली. या कालावधीत त्याने 11.13 च्या इकॉनॉमीवर धावा केल्या.
2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकप दरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती. यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला आणि त्यानंतर आयपीएल मध्ये वापस आल. आयपीएल नंतरच वर्ल्डकप खेळवला जाईल. अशा परिस्थितीत हार्दिकची वर्ल्डकपात निवड न होण्यामागे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणे हे प्रमुख कारण ठरू शकते. टीम इंडियाला वर्ल्डकपसाठी पूर्णपणे तंदुरुस्त हार्दिक पांड्याची गरज आहे.