भामरागड :- तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मतदार, मतदानापासून वंचित राहू नये. त्यांना मतांचे महत्त्व कळावे या उदात्त हेतूने सांज मल्टी अॅक्टीव्हीटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरीया,बिनागुंडा स्थीत भामरागड या सामाजिक संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष कुमार रुपलाल मारोती गोंगले या अवलियांनी सायकलवर मतदान जनजागृतीचे फलक लावून व साऊंड सिस्टिम बांधून गावागावात मतदान जनजागृतीचे कार्य स्वखर्चाने करित आहे.
"मत आपका अधिकार है, अपने अधिकारपर गर्व करे, मतदान करे."
"अंगुलीपर लगीन स्याहीका निशान सिर्फ निशानही नही,आपकी शान है, लोकतंत्र की जान है."
" कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट".
अशा आशयाचे घोषणा देत गत आठ दिवसांपासून रुपलाल गोंगले या अवलियांनी मतदान जनजागृतीचे कार्य स्वखर्चाने चालविले आहे.त्यामुळे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा तालुक्यात सर्वत्र होत आहे.