Chandrapur Sand Smuggling: अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदारांनी घेतला ताब्यात | Batmi Express

Pombhurna,Pombhurna News,Pombhurna Live,Sand Smuggling,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,

Pombhurna,Pombhurna News,Pombhurna Live,Sand Smuggling,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,

पोंभूर्णा
: - अंधारी नदी भिवकुंड घाटातून अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर बुधवार दि.२० मार्चच्या मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास पोंभूर्णा एमएसईबी ऑफीसजवळ तहसीलदारांनी पकडून तहसिल कार्यालयात जमा केले.

तालुक्यात रेतीघाटांचे लिलाव झालेले नाही व या दिवसात रेती उपसा पूर्णपणे बंद आहे. असे असताना रेती माफिया अंधाराचा फायदा घेत अवैध रेती वाहतूकीचा सपाटा लावला आहे.पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदी भिवकुंड घाटातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी कदम यांना मिळताच बुधवार दि.२० मार्चला मध्यरात्रीनंतर दिड वाजताच्या सुमारास रुपेश चन्नावार यांच्या मालकीची अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर क्र. एमएच ३४ बीएफ-१७७५ व ट्राली क्र. एमएच ३४ बीव्ही ७३७७ पकडुन तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात जमा केली.महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८(७)व (८)अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.