बीजापूर, दि. 27 : जिल्ह्यातील बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिप्पूरभट्टी परिसरात तालपेरु नदीजवळ सकाळच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत सहा (6) नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत असून त्यात दोन महिला नक्षलीसह डेप्युटी कमांडरचा सहभाग आहे. छत्तीसगडमधील बिजापूर येथील बासागुडा पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. कोब्रा २१०, २०५, सीआरपीएफची २२९ वी बटालियन आणि डीआरजी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. जवानांनी जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना घेरुन जोरदार गोळीबार केला. जवानांनी केलेल्या गोळीबारात ६ नक्षलवादी ठार झाले.
बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले होते. दरम्यान बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकुरभट्टी आणि पुसाबका गावांच्या जंगलात चकमक झाली. या कारवाईमध्ये डीआरजी, सीआरपीएफ 229, कोब्रा टीमचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, चकमकीनंतर घटनास्थळावरुन दोन महिला व चार पुरुष नक्षल्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या नक्षल्यांवर लाखो रुपयांचे बक्षीस होते. तर या चकमकीत अनेक नक्षली जखमी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान घटनास्थळाची झडती घेतली असता सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त केल्या आहेत. अद्यापही जवान परिसरात शोध घेत आहेत.
Bijapur, Dt. 27 : A police-Naxalite encounter broke out near Talperu river in Chippurbhatti area under Basaguda police station limits in the district. It is reported that six (6) Naxalites have been killed in this encounter, in which two female Naxalites and the Deputy Commander are involved.
Bastar Range Inspector General of Police Sundarraj P. told news agency PTI that a joint team of security personnel had left for anti-Naxal operations. Meanwhile, an encounter took place in the forest of Chikurbhatti and Pusabka villages under Basaguda police station limits. He said that DRG, CRPF 229, COBRA team were involved in this operation. He said that after the encounter, dead bodies of two women and four men Naxalites were recovered from the spot. There was a reward of lakhs of rupees for the killed Naxals. Many Naxalites are also expected to be injured in this encounter. Meanwhile, security forces have seized a large quantity of weapons, ammunition and daily necessities while searching the spot. Troops are still searching the area.