कोरचीत सहा दिवसीय रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचा समारोप, रेड रोज संघ विजेता तर अंकित इलेव्हन उपविजेता | Batmi Express

Korchi,Korchi News,Korchi Today,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Today,Gadchiroli live,

Korchi,Korchi News,Korchi Today,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Today,Gadchiroli live,

कोरची:  गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर टोकावरील आदिवासी बहुल कोरची तालुक्यामध्ये पहिल्यांदाच सहा दिवसीय रात्र कालीन क्रिकेट स्पर्धेचा आयोजन करण्यात आला होता. या सहा दिवसीय रात्रकालीन क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण १८ सामने खेळण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम रेड रोज संघ तर द्वितीय अंकित इलेव्हन संघ यांनी बाजी मारली आहे.

विजेता रेड रोज संघाला शनिवारी १६ मार्च रोजी रात्री प्रा.मुरलीधर रूखमोडे यांच्या हस्ते ट्रॉफी व ५१ हजार रोख बक्षीस देण्यात आले. सदर बक्षीस नितीन रहेजा व विशाल हाडगे यांच्यासह संघाने स्वीकारले. उपविजेता अंकित इलेव्हन संघाला प्रतिष्ठित नागरिक नंदलाल पंजवानी यांच्या हस्ते ३१ हजार रोख बक्षीस देण्यात आले. घनश्याम अग्रवाल डॉ. स्वप्नील राऊत यांच्यासह संघाने स्वीकारले.

कोरची तालुक्यातील युवकांनी  क्रीडा क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी, नगरसेवक गुड्डू अग्रवाल, डॉ. स्वप्नील राऊत, व्यापारी नितीन रहेजा, स्वप्निल कराडे, चेतन कराडे, प्रशांत कराडे, प्रा किशोर ढवळे, राजेंद्र शेखावत, विशाल हाडगे, परमेश्वर लोहंबरे यांनी समाजसेवेच्या भावनेतून आपली संकल्पना पुढे ठेवून कोरची तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व युवकांना या खेळामध्ये सहभागी होता यावे म्हणून आय पी एल च्या काही नियमानुसार के पी एल चा सहा दिवसीय रात्र कालीन क्रिकेट स्पर्धेचा आयोजन केला होता.

रविवार १० मार्च पासून सामन्याची सुरुवात झाली. यामध्ये पहिला सामना द हिट्स स्कॉड आणि हर्ष इलेव्हन यांच्यात रंगला या सामन्याला बघण्यासाठी  तालुक्यातील शेकडो नागरिक रात्री उपस्थित झाली होती. पहिले सेमी फायनल सामन्यांमध्ये माईटी हंटर संघा विरुद्ध अंकित इलेव्हन संघामध्ये सामना रंगला यामध्ये अंकित इलेव्हन संघ विजयी होऊन अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरे सेमी फायनल सामन्यामध्ये हर्ष इलेव्हन संघ विरुद्ध रेड रोज संघामध्ये रेड रोज संघ बाजी मारून अंतिम सामन्यात प्रवेश केला. फायनल सामना शनिवारी १६ मार्च रोजी रात्री अंकित इलेव्हन संघा विरुद्ध रेड रोज संघाशी सुरू झाली यामध्ये रेड रोज संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचे निर्णय घेतला व फलंदाजी करण्याचे आव्हान समोरच्या अंकित इलेव्हन यांना दिले. सामन्यात अंकित इलेव्हन संघाने दहा ओव्हर मध्ये ५१ रन काढण्याचा लक्ष दिला रेड रोज संघानी उत्कृष्ट फलंदाजी करून विजेता झाले.

या केपीएल स्पर्धेमध्ये एकूण सहा संघ सहभागी झाले होते त्यामध्ये पहिले संघ (माईंटी हंटर) नसरुद्दीन भामानी, किशोर ढवळे . दुसरे संघ (अंकित इलेव्हन) डॉ.स्वप्निल राऊत, घनश्याम अग्रवाल. तिसरे संघ (रेड रोज) नितीन रहेजा, विशाल हाडगे. चौथे संघ (द हिट स्कॉट) स्वप्निल कराडे, चेतन कराडे. पाचवे संघ (पॉवर फायटर) प्रशांत कराडे, छत्रपती बांगरे. सहावे संघ (हर्ष इलेव्हन) राजेंद्र शेखावत, परमेश्वर लोहंबरे यांचे असून या सर्व संघाने स्पर्धेत भाग घेऊन सहा दिवसीय रात्र कालीन क्रिकेट सामन्यात एकूण १८ सामने खेळली होती. यावेळी आयोजकांनी प्रेक्षकांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सह अंतिम क्रिकेट सामन्यामध्ये डीजेची व्यवस्था केली होती. तालुक्यातील असंख्य नागरिकांनी याचा भरभरून आनंद घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.