अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे जगातील सगळ्यात मोठे विद्यार्थी संघटन आहे, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी व शैक्षणिक भ्रष्टाचार रोखण्याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उपक्रम अभियान राबवीत असते, त्याच अनुषंगाने बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, बोर्डाच्या परीक्षेवेळी अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी सारखे प्रकार उघडकीस येतात. त्यामुळे अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते व शैक्षणिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार वाढतो. याला थांबवण्याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे राबवित आहे. यामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी आढळून येईल त्या ठिकाणी अभाविप तीव्र रोष व्यक्त करेल, सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा होण्याकरिता आपण आपल्या स्तरावरून विशेष प्रयत्न करावे, व ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी प्रकार आढळून येईल अशा परीक्षा केंद्राला शासनाच्या निर्देशानुसार तात्काळ वेळीच योग्य ती कारवाई करावी व यामध्ये पूर्णतः पारदर्शकता असावी अशी मागणी करत..
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अहेरी जिल्हा द्वारा कॉपी मुक्त परीक्षा केंद्र याकरिता अहेरी नायब तहसीलदार .कल्पना स्वपम , गटविकास अधिकारी मा. श्री.कांबळे सर,अहेरी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सोनुने तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी.सुहास वसावे सर..यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आलापल्ली नगर मंत्री व प्रांत कार्यकारिणी सदस्य रोहित व्ही. मुक्कावार,अहेरी नगरसह मंत्री आयुष मामिडवार,अहेरी नगर कार्यकर्ता संजय तिम्मा, करण मारशेट्टीवार,अजित पोदादी उपस्थिती होती..
English Edition:
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, the largest student organization in the world, is conducting a campaign to address the issues of academic corruption faced by students in both academic and social sectors. As the 12th exams proceed, numerous instances of cheating have been uncovered at examination centers, leading to the detriment of honest students and a rise in corruption within the education sector. To combat this, Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is spearheading the copy-free exam campaign. ABVP vehemently condemns cheating at examination centers and calls for concerted efforts to ensure all centers are free from malpractice. Any centers found to be facilitating cheating must take immediate action in accordance with government directives, promoting full transparency.
In Aheri District, the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad has designated Aheri Naib Tehsildar, Kalpana Swapam, as the authority for maintaining copy-free examination centers. A statement regarding this initiative was issued by Mr. Kamble, Aheri Assistant Police Inspector, along with Assistant Project Officer Suhas Vasawe. The event was attended by Rohit V. Mukkawar of Aheri Nagar, Minister Ayush Mamidwar, Aheri Nagar worker Sanjay Timma, Karan Marashettiwar, and Ajit Podadi.