Chandrapur Suicide: धावत्या रेल्वे समोर महिलेची आत्महत्या | Batmi Express

Mul,Mul News,Mul Suicide,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,

Mul,Mul News,Mul Suicide,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,

मूल: - दहा महिन्यांची मुलगी घरात ठेवून एका महिलेनी धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केली मूल शहरातील वार्ड क्रमांक 4 येथील रहीवाशी नंदु कामडे यांची पत्नी कुणाली नरेश कामडे (26) हीने आज दुपारी 4 वा. चे सुमारास चंद्रपूर मार्गावरील रेल्वे फाटक समोर धावत्या रेल्वे समोर उडी मारून कुणालीने आपली जीवन यात्रा संपविलयची घटना घडली आहे. 

रेल्वे स्टेशन पासुन रेल्वे फाटक हाकेच्या अंतरावर असल्याने ज्या रेल्वे खाली कुनालीने आत्महत्या केली त्या गाडीची गती घटनेच्या वेळेस हळु असल्याने कुणाली गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालय येथुन चंद्रपूर येथे नेत असताना त्यांचे निधन झाले. मृतक कुनाली हीचे पती नरेश धान खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे तर सासरे स्थानिक सिध्दी विनायक मंदिरा समोर चहा चे दुकान चालवुन कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवायचे.

कुनाली हीला 4 वर्षाचा मुलगा व 10 महिन्याची मुलगी आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असुन पुढील तपास  मुल पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.