तिघींवर आज गणपूर (रै.) येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार |
गडचिरोली (Gadchiroli) : काल २३ जानेवारी रोजी वैनगंगा नदीत बोट उलटून सहा महिलांना जलसमाधी मिळाली. यापैकी दोघींचे मृतदेह २३ जानेवारी रोजी तर एकीचा मृतदेह आज २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आढळून हाती लागला आहे. रेवंता हरीचंद्र झाडे असे आज मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे. मायाबाई अशोक राऊत, सुषमा सचिन राऊत, बुधाबाई देवाजी राऊत या बेपत्ताच आहेत.
हेही वाचा:
वैनगंगा नदीत नाव उलटून सहा महिला बुडाल्या, शोधमोहीम वेगात सुरू
पुष्पा मुक्तेश्वर झाडे व जिजाबाई दादाजी राऊत यांचे प्रेत कालच हाती लागले होते. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले. तर आज २४ जानेवारी रोजी रेवंता हरीचंद्र झाडे यांचा मृतदेह आढळून आला. या तिघींवर आज गणपूर (रै.) येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरीत तिघींचा शोध अद्यापही सुरूच आहे.