बीड :- काकाने पुतणीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बीडमधील ईट गावात घडली आहे. या हल्ल्यात पुतणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गळा, छाती आणि पोटावर धारदार शस्त्राने १० ते १२ वार करण्यात आले आहेत. सुरेश भास्कर गवळी असं आरोपीचं नाव आहे. याआधीही मुलीला त्याने त्रास दिल्याचं पीडित मुलीच्या आई वडिलांनी सांगितले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी सुरेश गवळी हा १७ वर्षीय पुतणीला तिच्या मैत्रिणीसोबत माझे संबंध जुळवून दे असं म्हणत होता. मात्र यास पुतणीने नकार दिल्याने आरोपीने पुतणीवरच हल्ला केला आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच या घटनेमुळे गावातील सर्व मुलींमध्ये भीतीचे वातावरण व दहशत निर्माण झालेली आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या ईट गावातील 17 वर्षीय तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. या तरुणीसोबत तिचा चुलत काका सुरेश भास्कर गवळी याने हुज्जत घातली व तुझ्या मैत्रीणीसोबत माझे संबंध प्रेम जुळवून दे, असे म्हणत तिच्यावर चाकूहल्ला केला. यात ती तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने या अगोदरही गावातील अनेक मुलींची छेड काढली होती. तसेच मुलींची देखील छेड काढली तर काढली पण शरीरसुखाची मागणी सुध्दा केली होती अशी धक्कादायक माहिती पीडितेच्या आई-वडिलांनी दिली. या आरोपीच्या छेडछाडीला कंटाळून गावातील मुलींचे शिक्षण बंद होण्याची वेळ आली आहे म्हणून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.