Suicide: अभ्यास करीत नाही म्हणून वडील रागावल्याने मुलीने घरी गळफास घेत आत्महत्या केली | Batmi Express

Be
0

Chamorshi,Chamorshi Suicide,Chamorshi News,Gadchiroli,Gadchiroli Suicide,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,

चामोर्शी:
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथील बारावीत शिकत असलेल्या श्रेया उंदिरवाडे या तरुणीने वडिलांनी अभ्यास करण्याचे कारणावरून रागवल्याने राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना 7 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास चामोर्शी पोलिस स्टेशन अंतर्गत घडली.

तालुक्यातील सोनापूर येथील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या अनिल उंदीरवाडे यांना दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. एक मुलगा नववीत शिकत असून श्रेया अनिल उंदिरवाडे ही चामोर्शी येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती. वडील अनिल यांनी श्रेयाला अभ्यास करण्याच्या कारणावरून रागावल्याने 7 जानेवारी रोजी रात्री 8.30 ते 9.30 वाजताच्या दरम्यान श्रेयाने घरीच ओढ़नीने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यामुळे कुटुंबीयांना चांगलाच हादरा बसला. सदर माहिती पोलिस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनस्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदनाकरीता मृतदेह ग्रामीण रुणालयात पाठविला व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->