गडचिरोली: पुन्हा; वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार, नागरिकांमध्ये दहशत निर्माण | Batmi Express

Be
0

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack,

गडचिरोली
, दि. ०७ जानेवारी : अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिलेवर काम करीत असताना वाघाने हल्ला करून महिलेला जागीच ठार केल्याची घटना घडली आहे.

सदर महिलेचे नाव सुषमा देविदास मंडल (५५)असून चिंतलपेठ येथील रहिवासी आहे.  चिंतलपेठ गावालगत असलेल्या गोंदूबाई कान्हो दुर्गे यांच्या घरालगत असलेल्या शेतात सद्या कापूस काढण्याचे काम चालू आहे. त्यात आज दोन महिला कापूस काढत असताना अचानक वाघाने हल्ला केला. यात महिलेनी आरडाओरड केली असता वाघ आक्रोशात येऊन वाघाने थेट महिलेवर उडी घेत तिला जागीच ठार केले.

घटनेची माहिती होताच नागरिकांनी एकच बघ्याची भूमिका घेतली आहे. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून बातमी लिहीतोस्तव घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी पोहोचलेले नाहीत.

सदर घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा ही मागणी नागरिकांत जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->