Suicide: खऱ्या प्रेमाच्या धोक्‍याने दु:खी प्रेयसीने संपवले जीवन; युवकाला अटक | Batmi Express

Armori,Armori Crime,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Suicide,Armori Suicide,

Armori,Armori Crime,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Suicide,Armori Suicide,

गडचिरोलीदोन वर्षांपासून असलेलं प्रेमसबध अचानक नाकारुन लग्नास विरोध केला म्हणून दुःखी झालेल्या प्रेयसीने आपली जीवनयात्रा संपवली. तर दुसऱ्याच युवतीशी लग्न करु पाहणाऱ्या युवकास साक्षगंधापूर्वीच पोलिसांनी बेड्या घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगेश सुरेश चौधरी वय २८ रा. रामपूर, ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली असे अटकेतील युवकाचे नाव आहे.

मृत युवती आरमोरीतील एका महाविद्यालयात बीए प्रथम वर्षात शिकत होती. ट्रॅक्टर चालक असलेल्या मंगेशसी तिचे प्रेम संबध जुळले. पाहता पाहता दोन वर्षे उलटले. प्रेमात आंधळे झालेल्या दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अशातच मंगेशचे लग्न दुसऱ्या युवतीशी जुळले. ही बाब कळताच मंगेशच्या प्रेयसीचे अवसान गळाले. तिने त्याला जाब विचारला. मात्र, मंगेशने तिला नकार देऊन दुसऱ्या युवतीशी लग्न ठरल्याचे सांगितले.

पुढे प्रेयसी युवतीने १८ जानेवारीला आरमोरी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांनाही समोरासमोर बोलावले. मात्र, मंगेश दुसऱ्या युवतीशी लग्न करण्यावर ठाम राहिला. यामुळे दुःखी झालेली प्रेयसी घरी निघून गेली. १९ जानेवारीला त्या युवतीचे आईवडील आरमोरीच्या बाजारात भाजीपाला विकण्यासाठी व भाऊ शेळ्या चारण्यासाठी गेला होता. ही संधी साधून प्रेयसी युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुसरीकडे मंगेशचा साक्षगंध दुसऱ्या युवतीशी २१ जानेवारीला होणार होता. मात्र, प्रेयसीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर साक्षगंधापूर्वीच पोलिसांनी मंगेशला कारागृहाची हवा दाखवली आहे. आरमोरी पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.