Alert: उद्याला गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपुर,भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा | Batmi Express

Gadchiroli,Chandrapur,Bhandara,Gadchiroli Rain,Gadchiroli Rain 2023,Chandrapur Rain,Chandrapur Rain 2023,Bhandara Rain News,Heavy Rain 2023,Weather,We

Gadchiroli,Chandrapur,Bhandara,Gadchiroli Rain,Gadchiroli Rain 2023,Chandrapur Rain,Chandrapur Rain 2023,Bhandara Rain News,Heavy Rain 2023,Weather,Weather Live,

गडचिरोली :- भर उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यातही पाऊस पडतो आहे.अशातच हल्ली सुरू असलेल्या हिवाळ्यातही अवकाळी पावसाने कहर केला असल्याने पाऊस पाडण्याचा नेमका ऋतू कोणता? अशा संभ्रमात सर्वच जण पडले आहेत.मागील काही दिवसांपासून वातावरण निरभ्र असतांनाच पुन्हा हवामान विभागाने विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.विशेषतः जिल्ह्यात हवामान विभागाने आज व उद्या दोन दिवस अलर्ट जाहीर करीत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळीचे सावट कायम असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे.मागील आठवड्यात नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या धान कळपा पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर या ढगाळी वातावरणाचा तूर पिकालाही फटका बसला आहे.दरम्यान मागील ४ दिवसांपासून जिल्ह्यात निरभ्र आकाश उजाळले होते.अशातच हवामान विभागाने उद्याला गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपुर,भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची पुन्हा शक्यता वर्तविली.या शक्यतेनुसार आज,मंगळवारी पहाटेपासूनच ढग दाटून आले.सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या.दरम्यान नागपूर विभागाने परत पुन्हा उद्याला येलो अलर्ट जाहीर करीत जिल्ह्यासह दोन जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी धान कापणी,बांधणी व मळणीच्या लगबगीत असतांना अवकाळी पावसाचा कहर शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरविणारा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.