कोरची: स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथील मुख्याध्यापक अरविंद दयाराम टेंभूरकर सर यांचा सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हिराजी रामटेके केंद्र प्रमुख तथा गटसमन्वयक कोरची हे होते तर सत्कारमूर्ती अरविंद टेंभूरकर मु.अ यांच्यासह शाळेतील शिक्षिका काटेंगे, मेघा बुराडे, कांता साखरे, आरती चांदेकर, शिक्षक मारोती अंबादे, महेश जाळे, विनोद भजने, दिलीप नाकाडे हे उपस्थित होते. यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांनी टेंभूरकर सरांना भेटवस्तू देऊन सत्कार करून निरोप दिला. सर्व शिक्षकांनी भावुक होऊन आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान अरविंद टेंभूरकर सर मुख्याध्यापक जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची यांनी मुख्याध्यापकाचे काम अतिशय उत्तमरीत्या पार पाडले. त्यांची कष्टाळू वृत्ती वाखानन्याजोगी आहे. मुलांबरोबर रममाण होऊन त्यांच्या सारखे रंगुन जात गीत गायन, नाटयीकरण, नक्कल करून सर्वांना हसवत ठेवणे, उत्कृष्ट वक्ता, वक्तशीरपणा, दयाळूवृत्ती, सहकार्यवृत्ती, उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून काम करणारे असे अरविंद टेंभूरकर सर सर्व गुणसंपन्न वक्तीमत्व असे मत शिक्षकानी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करणारे, सर्वांशी प्रेमळ वागणारे अरविंद टेंभूरकर मु.अ. हे 30 नोव्हेंबर 2023 ला सेवानिवृत्त झाले टेंभूरकर सरांना खूप दु:ख झाले. माझ्या विद्यार्थ्यांना मला शिकवता येणार नाही याचे त्यांना खूप दु:ख झाले. साश्रूनयनांनी सर्वांनी निरोप दिला. कोरची केंद्रातील सर्व शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांनी अरविंद टेंभूरकर मु.अ. यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करून निरोप देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती चांदेकर यांनी केले. आभारप्रदर्शन कांता साखरे यांनी केले.