ब्रम्हपुरी येथे शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन चा तालुका मेळावा संपन्न | Batmi Express

Be
0

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Live,Bramhapuri Today,Chandrapur,Chandrapur News,

ब्रम्हपुरी
: -  गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत  अगदी 1500 रु तुटपुंज्या  मानधनात जिल्हा परिषद व प्रायव्हेट शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी प्रचंड वाढलेल्या महागाईत जगावे कसे ? असा एक्ष प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.संघटनेच्या अथक संघर्षातून 9 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णय नुसार शापोआ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एप्रिल महिन्या पासून 1000 रू.मासिक वाढ केलेली आहे .परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने शापोआ कर्मचारी सरकार प्रती तीव्र नाराजी व्यक्त करत .कुटुंब चालण्या योग्य मानधन वाढ व किमान वेतन लागू करण्यात यावे यासह इतरही मागण्यासाठी 14 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा धिकारी कार्यालय वर तर 18 डिसेंबर रोजी नागपूर विधान सभेवर विराट मोर्चा आयोजित केला आहे ,या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या  अध्यक्षतेखाली स्थानिक जिल्हा परिषद शाळा पेठवांर्ड येथे  तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष कुंदा कोहपरे,जयघोष दिघोरे,राज्य संघटक कॉ.श्रीधर वाढई  ,रेखा धोंगडे,यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यात  कर्मचाऱ्यांन च्या विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान 26 हजार रु.वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी,दर महिन्याला मानधन व इंधन बिल देण्यात यावे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये ,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत ग्यास सिलेंडर ,धान्यादि माल व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी ,दिवाळी बोनस(भाऊबीज) लागू करण्यात यावे. शापोआ कर्मचाऱयांना शाळा व शाळेचा संपूर्ण पटांगण झाडन्यास सांगू नये.दर 3 महिन्यातून जिल्हास्तरावर संघटने सोबत बैठक आयोजित करून स्थानिक समस्यांचा निपटारा करण्यात यावा यासह  विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली.

मानधन वाढ व इतर मागण्यासाठी 14 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा धीकारी कार्यालय वर तर 18 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर राज्यव्यापी आक्रोश मोर्चा करणार असल्याचा  इशारा कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.तर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन कॉ.कुंदा कोहपरे यांनी केले आहे .

मेळाव्यात तालुक्यातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

सदर कार्यक्रमाचे संचालन कॉ.जयघोष दिघोरे,प्रास्ताविक श्रीधर वाढई व आभार देवेंद्र भरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->