ब्रम्हपुरी: शेतात विद्युत प्रवाहाचा करंट लागून एका पट्टेदार वाघाचा मृत्यू | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Live,Bramhapuri Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Live,Bramhapuri Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

चंद्रपूर / 
ब्रम्हपुरी वन विभाग ब्रम्हपुरी अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटातील मेंढामाल, येथील एका खासगी शेत शिवारात गट क्रमांक. १६४ मध्ये एक वाघ शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्याला मृत अवस्थेत दिसून आला. घटनास्थळी तोंडाला विद्युत करंट लागून वाघ मेल्याचे निदर्शनास आले. मृत वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे असून नर वाघ आहे.

त्यावेळेस मोक्का पंचनामाच्यावेळी घटनास्थळी वन्यजीव प्रेमी यश कायरकर स्वाब नेचर केअर फाउंडेशन, बंडू धोत्रे ए.टी.सी.ए. प्रतिनिधी, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक ब्रह्मपुरी, पंकज माकोडे नेचर एनवोर्मेन्ट अँड वाईल्डलाईफ ऑर्गनायझेशन ब्रम्हपुरी, यांच्या उपस्थित मध्ये मोक्का पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता सिंदेवाही वन विभागाच्या लाकूड डेपोमध्ये शवविच्छेदन करण्यात आले.

शव विच्छेदन डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा, डॉ.शालिनी लोंढे पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही, डॉ. सुरपाम पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही यांनी केले.

समोरील तपास सहाय्यक उपवनसंरक्षक चोपडे, यांचे मार्गदर्शनात विशाल सालकर वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही हे करीत असून एका आरोपीला अटक केले आहे तर आणखी किती  आरोपी यात समावेश होते याचा तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.