कोरची : कोरची-कुरखेडा महामार्गावरील बेडगाव घाटाच्या एका चढावावर आज सकाळी दहा वाजता दरम्यान रस्त्याच्या मधोमध दोन अवजड ट्रक फेल पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. या मार्गावरून कुरखेडा व कोरचीला ये-जा करणारे अनेक प्रवासी घाटावरच अडकले आहेत. चारही बाजूने घनदाट जंगल, डोंगर दरी असून येथे बिबट व अस्वल सारख्या वन्य प्राणाचे मुक्त संचार आहे. तसेच बेडगाव घाट नागमोडी व तीव्र उतार-चढ आणि ७० फूट दरी असणारा हा नऊ किलोमीटरचा रस्ता आहे. या ठिकाणी अनेकदा अवजळ वाहनांच अपघात होऊन अनेकांची जीव गेले आहे.
चार ते पाच दिवसांपासून कुरखेडा वरून कोरचीच्या दिशेने निघालेला अवजड ट्रक बेळगाव घाटाच्या पहिल्या चढावर इंजिनमध्ये बिघाड आल्यामुळे ट्रक फेल झाले असून वाहन चालक इंजिन दुरुस्ती करण्यासाठी गेल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मधातच उभे होते दरम्यान आज सकाळी दहा वाजता कुरखेडा वरून लाकूड भरून निघालेलं अवजड ट्रक बिघाड झालेल्या ट्रक जवळच फेल झाले त्यामुळे दोन्ही बाजूने रस्ता जाम होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. मोटर सायकलस्वार घाटावरील नालीच्या एका काठाने मोटारसायकलनी जात आहेत. तर त्याच नालीमध्ये दोन ते तीन तासानंतर लहान चार चाकी वाहनचालक मोठ-मोठी दगडे टाकून मोठ्या शिताफीने आपली कार पुढे काढुन प्रवास करत आहेत परंतु बसेस, ट्रक, मेटाडोर अशी मोठी वाहने येथे अडकून पडली आहेत.
एक दिवसापूर्वीच छत्तीसगड वरून कोंबड्यांचं खाद्य घेऊन आंध्रप्रदेशाकडे निघालेला ट्रक घाटावरील चढावरून रिव्हर्स येऊन रस्त्याच्या कडेला उलटला आहे महिन्यातून शेकडो ट्रक या घाटावर उलटतात आणि अपघात होतात या घाटावरुन 24 तास अवजड ट्रकांची वर्दळ असते खास करून छत्तीसगड वरून हैदराबादला जाणारी ट्रक तर सुरजागड वरून छत्तीसगडला निघालेली अवजड ट्रक याच घाटावरून ये-जा करतात त्यामुळे लहान वाहन चालक घाटातील चढावरून ट्रकमागे असले की ट्रक उलट रिव्हर्स येऊन धडकणार तर नाही अशा प्रकारे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागते.