गडचिरोली :: आधुनिक भारताच्या निर्मितीचा मजबुत पाया रचणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न स्व. पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, भव्य निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
"आधुनिक भारताच्या निर्मितीत पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे योगदान" या विषयाला घेऊन वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा पार पडणार असून, निबंध स्पर्धेच्या स्पर्धकानी, निबंध आपल्या सुवाछ अक्षरात लिहून 17 नोव्हेंबर सायंळी पाच वाजे पर्यंत जिल्हा कार्यालयात नेऊन द्यावयाचे आहे. वक्तृत्व स्पर्धा हि 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता कात्रटवार सभागृ्हात पार पडणार आहे, त्यानंतर दोन्ही स्पर्धेतील प्रथम, द्वितिय आणि तृतीय विजेत्याला रोख रक्कम 5000, 3000, 2000 आणि दोन आकर्षक प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे. कोणत्याही स्पर्धेला शुल्क आणि वयाचे बंधन नसून इच्छुक स्पर्धाकांनी जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येते किंवा 7620869761, 8830737890, 9923815724 क्रमांकावर संपर्क साधावे. असे आवाहन जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.