वैनगंगा नदीत बुडून युवकाचा मृत्यू | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Etapalli,Drowned,

चामोर्शी: (कूनघाडा रै) - डोनाळा वैनगंगा नदी घाटावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 13 नोव्हेंबर रोजी घडली. करण गजानन गव्हारे (25) असे मृत युवकाचे नाव आहे. 

एटापल्लीहुन स्वगावी आला आणि आपल्या 11 मित्रांसोबत गावाशेजारी असलेल्या वैनगंगा नदीघाटावर अंघोळ करायला गेले असता त्यापैकी तीन मित्र हे तिथे ठेऊन असलेल्या डोंग्यावर बसले त्यानंतर अचानक डोंग्यात पाणी शिरू लागल्याने एक मित्र पाण्यात उडी घेतला तेव्हा पाण्याबाहेर असलेला करण मित्राला वाचवायच्या प्रयत्नात खोल पाण्यात गेल्याने, मित्र बाहेर आला मात्र करण वाहून गेला.
तेव्हापासून पोलीस कर्मचारी बोट नी व नातेवाईकांनी नदीत फिरून व ड्रोन कॅमेरा च्या सहाय्याने करणचा शोध घेतला.
परिसरात वारंवार अश्या घटना होत असून थोडाफारच पोहता येणारा करण पोहण्यासाठी गेल्याने घरच्यांसह अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. 

दोन दिवसांनतर 15 नोव्हेंबर ला पहाटे एका मच्छिमाऱ्याला त्याचा मृतदेह तळोधी नदी परिसरात दिसताच त्याने नातेवाईकाला सांगितले.
    
चामोर्शी येथील रुग्णालयात मृतदेहाचे शवपरीक्षण केल्यानंतर करणचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
    त्याच्या पच्छात आई बाबा, आजा आजी व एक विवाहित बहीण आहें . त्याच्या अशा जाण्याने घरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 
    तलाठी नितीन मेश्राम, पो. पा. दिलीप शृंगारपवार व चामोर्शी पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन या घटनेची नोंद चामोर्शी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चामोर्शी पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->