सावली : सावली तालुक्यातील व्याहाड बूज. येथील (१८) वर्षीय युवक आर्यन यादव सातपैसे हा युवक इयत्ता १२ वी मध्ये नवभारत विद्यालय व्याहाड बूज. येथे शिक्षण घेत होता. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास स्वतःची गाडी घेऊन शौचालयास जातो असे घरी सांगून निघून गेला. त्याच दिवशी ११:०० वाजेच्या सुमारास त्याची गाडी वैनगंगा नदीच्या पुलावर आढळून आली. घरच्या लोकांनी सर्व नातेवाईकाकडे, आजूबाजूला, गावात, बाहेर चौकशी केली असता तो कुणाच्याच घरी मिळाला नाही. त्यामुळे सावली पोलीस स्टेशनला त्याचे वडील यादव सातपैसे यांनी आर्यन यादव सातपैसे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
तेव्हापासून सावली पोलीस आणि घरचे व्यक्ती त्याचा शोध घेत होते मात्र, त्याचा तपास कुठेही लागलेला नव्हता. अखेर १९ दिवसानंतर ११ ऑक्टोंबर रोजी सोनापूर नदीपात्रातील पाण्याच्या टाकीजवळ एक प्रेत झाडाला लटकलेला आढळून आला असल्याची माहिती मिळाली.
यावरून सावली पोलीस यांनी चौकशी केली असता तो प्रेत व्याहाड बूज. येथील आर्यन यादव सातपैसे याची असल्याचे सिद्ध झाले. सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास सावली ठाण्याचे ठाणेदार आशिष बोरकर आणि त्यांचे सर्व सहाय्यक पोलीस कर्मचारी यांनी केले.