कुरखेडा (Video): वाघाच्या हल्यात महीला जागीच ठार | Batmi Express

Be
0

kurkheda,kurkheda live,Kurkheda News,Kurkheda Tiger Attack,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack,Gadchiroli Batmya,

कुरखेडा
: प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्याच्या चिचेवाडा बिटातील ठुसी येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.  वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव सायत्रा अंताराम बोगा  (वय 55) वर्ष रा. ठुसी ता. कुरखेडा जी. गडचिरोली असे आहे.

सदर महिला कुरखेडा (ठुसी) येथील असुन ती शेतीलगतच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी व झाडू कापण्यासाठी गेली असता अचानक वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले . त्या महिलेचे सायत्रा अंताराम बोगा  (वय 55) वर्ष रा. ठुसी असे आहे. 

या घटनेची  माहिती मिळताच देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या परिसरात वाघाचा वावर नसल्याने सायत्राबाईंना बिबट्याने ठार केले असावे, असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी मेहेर यांनी व्यक्त केला. सायत्राबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे आहेत.

चिचेवाडा बिटात सध्यातरी वाघाचे लोकेशन नाही. त्यामुळे सायत्रा बाेगा ही महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.   घटनास्थळावर हल्लेखोर प्राण्याचे पायाचे ठसे तज्ज्ञ चमूकडून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या चमूच्या अहवालानंतरच हल्ला करणारा प्राणी वाघ की बिबट हे स्पष्ट होईल. हल्लेखोर प्राण्याची दहशत या परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->