वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी या गावांमध्ये अवैध बनावट दारू विकत असल्याबाबतची तक्रार चिकणी येथील ४० महिलांनी शेतावर जान्याचा बहाना करित लपून राहून अवैध बनावट दारू पकडली, याची माहिती पोलीस विभागाच्या 112 क्रमांकावर दिली, गाडीसह पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाले ती बनावट दारू पोलिसांच्या स्वाधीन केली.
२ ऑक्टोंबर हा गांधी जयंतीचा दिवस असून या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सर्व दारू उत्पादन शुल्क यांना प्राप्त होते ,या दिवशी सर्व परवानाधारक बियर बार, देशी भट्टी ,दारू दुकाने बंद असतात याचाच फायदा घेत अनेक अवैध दारू विक्रेते आदल्या दिवशी म्हणजेच एक आक्टोंबरला अवैध देशी, विदेशी दारू खरेदी करून ठेवत असतात ,ही अवैध दारू दोन आक्टोंबर रोजी तीन पट पैशाने विक्री करीत असतात या दारू दुकानावर दारू उत्पादन शुल्क मात्र कोणत्याही प्रकारचे सिल दुकानांना लावत नसतात यासाठी दारू उत्पादन विभागाला लाखो रुपयाचा चंदा मिळत असल्याचे दिसून येत येते यासाठी एका कर्मचाऱ्यांची अवैध्यरित्या नियुक्ती ही करण्यात येते. दोन आक्टोंबरला हा अवैध् दारू साठा संपताच मागील दरवाज्यातून दारू बाहेर काढून पुरविल्या जाते हे वास्तविक चित्र वरोरा शहरातील नेहरू चौक परिसरात दिसून येते याचे लोणही आता ग्रामीण क्षेत्रातही वाढल्यामुळे दारूबंदी असतानाही अवैध् विक्री जोमात सुरू असते, एक एक दारू विक्रेत्याकडून पाच पाच पेट्यांची विक्री चिकणी , डोंगरगाव , महाडोळी, बोपापूर , मसाला , शेगाव , अशा अनेक गावात केल्या जाते दिनांक 6 सप्टेंबर रोजी चिकणी येथील असंख्य महिलांनी याबाबत पोलीस विभाग, दारू उत्पादन शुल्क विभाग यांना गावातील अवैध बनावट दारू बंद करण्यासाठी तक्रार अर्ज देण्यात आला होता मात्र वीस दिवसानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाही संबंधित विभागाकडून झाली नसल्याने अखेर संतप्त महिलांनी अवैध दारू घेऊन येणाऱ्या दारू विक्रेत्याला पकडून दिले होते त्यानंतर ही मात्र यावर अंकुश लावण्यात पोलीस विभाग, दारू उत्पादन शुल्क विभाग, एलसीबी अपयशी ठरल्याने दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी असंख्य महिलांनी मिळवून अवैध बनावट दारू पुन्हा पकडून 112 ला फोन करून पोलिसांच्या स्वाधीन केली या अवैध् बनावट दारू व्यवसायिकांवर कारवाई करून परत ही दारू आमच्या गावात येणार नाही याची दखल घ्यावी, पकडण्यात आलेली अवैध् दारू बॉटलवर बॅच नंबर आहे ती दारू कोणत्या अधिकृत डीलर विक्रेताची आहे ,त्या डीलर वर सुद्धा कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असताना पोलीस अधिकारी मात्र त्यावेळी दारू विक्रेत्याला पकडून कायदेशीर कारवाही करून सोडून देत असल्याने ,अधिकृत दारू विक्रेत्यावर मात्र कोणतीही कायदेशीर कारवाही पोलीस विभाग, दारू उत्पादन शुल्क विभाग ,एलसीबी होत नसल्याने त्याची सुद्धा हिम्मत वाढलेली आहे गावात ग्रामीण क्षेत्रात एक सरदार ही अवैध बनावट दारू पुरविण्याचे काम करीत असल्याची माहिती महिलांनी प्रतिनिधीला दिल्याने गावातील महिलांना जीवे मारण्याची धमक्या देत आहे,एवढेच नव्हे तर खालून वर पाहण्याची भाषा आता हे दारू विक्रेते देत असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास या घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार राहील अशी तक्रार महिलांनी पोलीस स्टेशन वरोरा ,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे दिनांक 2 ऑक्टोंबर रोजीदिली यावेळी प्रीती संदीप फुलकर , संगीता मनोज मेश्राम , मंदाबाई मारुती दातारकर , राधाबाई रामजी धांडे , मनीषा कमलाकर मेश्राम , मंजुषा राजू वानखेडे , जयश्री संजय डाखोरे , रशिदा इस्राईल शेख , कविता प्रकाश मडावी , कुसुम लक्ष्मण आत्राम , मंगला किसन चतुरकर , शोभा अन्नाजी घोडे , संगीता दिगंबर माथनकर , स्वाती मेघराज माथनकर , शशिकला शामराव माथनकर , चंद्रकला प्रकाश बोधे , कुसुम माणिक खारकर , नम्रता दिनेश कारमोरे , श्वेता राकेश रामटेके , अरुणा प्रवीण बदखल , रंजना किशोर ढेंगळे , वंदना प्रवीण खोके , ललिता सोमेश्वर पाल , छाया अंकुश धांडे , शालू अशोक हिवरकर , गौसिया कादर खा पठाण , वैशाली मुकेश लाकडे , इंदिरा बंडू गानफाडे , साधना नामदेव गाणफाडे उपस्थित होत्या.
मोहसिन सय्यद वरोरा