ब्रम्हपुरी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17- 10- 2023 ला वर्धा येथे विभागीय शालेय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विभागीय स्पर्धेत नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयाच्या U/14 मुलींच्या संघाने प्रथम सामन्यात नागपूर मनपा संघाचा ११-५ ने पराभव करीत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळविला .त्यानंतर सेमी फायनल मध्ये वर्धा संघाचा १५-४ असा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला.
अंतिम सामना हा कोंढाळी (जिल्हा नागपूर) सोबत खूप अटीतटीचा झाला .मुलींनी आपले कौशल्य पणाला लावून अखेर हा सामना ६-४ अशा फरकाने जिंकून विभागीय स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळवला.
तसेच दिनांक ५-११-२०२३ ते ०८-११-२०२३ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचे नेतृत्व करण्याचा मान नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय ब्रम्हपुरी या शाळेला मिळाला आहे.
नेवजाबाई भैया शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री अशोकजी भैया साहेब तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी ,शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ पी. व्ही .बनपुरकर मॅडम, उपमुख्याध्यापक मा.श्री भैया सर, पर्यवेक्षक मा. श्री निखारे सर ,सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना शाळेच्या क्रीडा प्रशिक्षक एन.पी .भारती मॅडम, श्री आर. एच. बारेकर सर , हँडबॉल कोच सूरज मेश्राम आणि शुभम जुआरे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. या सर्वांच्या विशेष प्रोत्साहनामुळे शाळेला हे धवल यश प्राप्त करता आले .