आरमोरी: ट्रक आणि दुचाकीचा भिषण अपघात; दोन तरूण जागीच ठार तर एक गंभीर | Batmi Express

Armori,Armori Accident,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli Today,Gadchiroli Accident,Gadchiroli News,

Armori,Armori Accident,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli Today,Gadchiroli Accident,Gadchiroli News,

आरमोरी
: प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी-गडचिरोली वरून आरमोरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्पर चालकाने एका मोटरसायकलला जबर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात दोन युवक जागीच ठार तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आरमोरी गडचिरोली मार्गावरील आरमोरी तालुक्यातील किटाळी गावानजीक दिनांक21 ऑक्टोबरला रात्रौ १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. मृतक युवकाचे नाव मनीष नेताजी मेश्राम वय वर्षे १९ रा. विकास नगर ता.ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर,सुरज विलास मशाखेत्री वय वर्षे 23 रा. इंदिरानगर चंद्रपूर असे आहे. तर गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव तुषार दशरथ मडावी वय वर्षे 23 राहणार संजय नगर चंद्रपूर असे आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक सुरज मशाखेत्री, मनीष मेश्राम व तुषार मडावी हे तिघे मित्र आरमोरी येथे दुर्गा उत्सव बघण्यासाठी आले होते. हे तिघेही मित्र दुर्गा उत्सव बघून एम. एच. 34 बी. डब्ल्यू. 3702 एन. एस. 220 पल्सर या क्रमांकाच्या मोटरसायकलने हे तिघेही आरमोरी वरून गडचिरोली मार्गे जात होते. दरम्यान किटाळी- चुरमुरा गावाजवळ गडचिरोली वरून आरमोरी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम.एच 33 डब्ल्यू 0555 या क्रमांकाच्या टिप्परच्या चालकाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मनीष मेश्राम, सुरज म्हशाखेत्री हे टिप्पर खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर तुषार मडावी हा दुचाकीवरून उसळून पडल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व टिप्पर चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.