सिरोंचा - सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नॅशनल हायवे 63 वाडदाम गावापासून दुर्गम भाग चिटूर आणि अमडेल्ली कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते चिकलमय झाली आहे, त्या रस्त्यावरून चिटूर आणि अमडेल्ली गावांचे गावातील नागरीक आणि विद्यार्थी मुख्यालयात येण्या - जाण्या करतात, रस्ते पूर्ण चिकलमय झाल्याने चिकलातून येण्या- जाणे करण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे,
गावात जाणाऱ्या अनेक वाहन चिकलात अडकून जात आहे, ही गंभीर विषयांची माहिती वारंवार ग्रामस्थांनी संबंधित विभागाला माहिती देऊनही समस्या दूर होत नाही, अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर भाऊ मूलकला यांनी चिटूर गाव दौऱ्यावर असता ग्रामस्थांनी रस्त्याचे समस्या दूर करण्याची विनंती केली,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर भाऊ मूलकला यांनी संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांशी बोलून तसेच निवेदन देऊन मागणी करू,लवकर समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतील,समस्या दूर न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, जनतेच्या सेवेत, आपण आपल्या तालुका विकासासाठी शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबंद असल्याचे सांगितले आहे,
त्यावेळी चिटूर गावाचे नागरिक आणि गावातील युवक - युवतींसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते,