Rojgar Updates: 8 सप्टेंबरला महारोजगार मेळाव्याचे आयोजन | Batmi Express

Be
0

Bhandara,Bhandara Batmya,jobs,career,Bhandara Live,Bhandara Today,

भंडारा : जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार युवक व युवतीना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर यांचे संयुक्त विद्यमाने 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर या ठिकाणी पंडित दीनदायल उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या सहभागी होणार असून या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतीना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.त्या मेळाव्याच्या अनुषंगाने नियोक्त्यांनी त्यांचेकडील रिक्तपदांची माहिती कौशल्य विकास,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील त्यांचे लॉगीनमधून पंडित दीनदायल उपाध्याय महारोजगार मेळावा येथे अधिसूचित करावीत.

तसेच नोकरीइच्छुक महिलांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावा.तसेच मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखत व तत्सम प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्याच्या दिवशी व वेळेत शैक्षणिक कागदपत्राच्या छायाकिंत प्रती व पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहावे,
या मेळाव्याचा जिल्हयातील अधिकाधीक गरजू युवक व युवतीनी या सुवर्णसंधीचा आवश्यक लाभ घ्यावा, तसेच याबाबत काही अडचण शंका असल्यास कार्यालयाच्या 07184-252250 व मोबाईल क्रमांक 7620378924 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र,भंडारा येथील सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->