आरमोरी: फेसबुक वरील प्रेम तंटामुक्तीच्या सहकार्याने विवाह बंधनात | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli News,Armori,Armori Live,Armori News,

Gadchiroli,Gadchiroli News,Armori,Armori Live,Armori News,

गडचिरोली :
- फेसबुकवर प्रेम फुलले. त्यांनी विवाह करण्याच्या आणाभाका घेतल्या. त्यांच्या या प्रेमास आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गांव समितीने विवाहबंधनात बांधले. आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी येथील राहुल जयदेव टेंभुर्णे याने चंद्रपूर येथील तरुणी प्रज्ञा रवी रामटेके हिच्या सोबत फेसबुकवर मैत्री जुळली. ही मैत्री फुलतच गेली. त्यांना एकमेकाशिवाय चैन पडत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात एक मेकांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. 

पोळ्याच्या निमित्ताने चंद्रपूरवरून प्रज्ञाने भाकरोंडीकडे धाव घेतली व सरळ राहुलच्या घरी आली. राहुल याला आई - वडील नसल्या कारणाने गावीच आपल्या मामा कडे राहत होता. प्रज्ञा घरी आल्यानंतर त्याने आपल्या मामा ला पूर्ण हाकिगत सांगितली . राहुलचे मामा हिराजी जनबंधू यांनी दोघांची विचारपुस करून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती भाकरोंडीकडे अर्ज सादर केला. भाकरोंडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गांव समितीने सभा बोलावून कायदेशीर कागद पत्र मागितले व त्यांची चैकशी केली. दोघांची समस्या जाणून घेतली व कुठलीही जीवित हानी होऊ नये या कारणाने समितीचे


 अध्यक्ष देवराव सहारे यांनी पुढाकार घेऊन या दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि २४ सप्टेंबरला त्या प्रेमियुगलांचे त्यांच्या समाजाच्या रितिरिवाजाप्रमाणे विवाह लावून दिला. या विवाह प्रसंगी समितीचे उपाध्यक्ष मोबीन शेख, संदेश बोदेले, भान्सी येतील पोलीस पाटील मयुरी उसेंडी, यशवंत टेम्भूर्णे, मनीराम पदा, नरेंद्र टेम्भूर्णे आणि भाकरोंडी येथील गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.