भंडारा,दि.17 : अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ,नागपूर उद्योग व वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार, यांचे मार्फत दि.22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवन ,जिल्हाधिकारी कार्यालय ,भंडारा येथे आउटरिच कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
उत्पादन व रोजगार वाढ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन:
भारत सरकार तर्फे जिल्ह्यात निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचे दृष्टीने निर्यातीस प्रोत्साहन ,उत्पादन व रोजगार वाढ करण्याकरिता प्रयत्नाचा भाग म्हणून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात DGFT नागपूर कार्यालयामार्फत IEC नोंदणी ,निर्यात प्रक्रिया निर्यातीबाबत शासनाच्या योजना ,निर्यातीत भांडवल पर्याय , ई- कॉमर्स आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील उत्पादकांना/निर्यातदारांना या कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन करावी,असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा यांनी कळविले आहे.