गडचिरोली : गोंडवाना विदयापीठ गडचिरोली च्या उन्हाळी परीक्षा होऊन तब्बल दोन महिने होऊन ही निकाल अध्याप लागले नाही. विद्यापीठातील अधिकाऱ्यांना विचारल्या असता उडवा उडवीचे उत्तर त्यांच्या कडून दिले जाते अभाविप णी वारंवार पाठ पुरावा करत निकाल लवकरात लवकर लावावे, अशी मागणी निवेदना तुन कुलगुरू महोदय, तसेच परीक्षा नियंत्रकांना केली.
MKCL या कंपनीला परीक्षा विभाग द्वारे निकाल लावण्याकरीता चा ठेका दिला आहे परंतु ही कंपनी व्यवस्थित काम करत नाही असे विदयापीठ कर्मचारी सुद्धा सांगतात तरी ही त्यांच कंपनीला का काम द्यायचे असा प्रश्न आता उभा होतोय. यात विद्यापीठ स्वतः ची चूक लपवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहे.
या वर्षी च्या परीक्षेत हजारो विद्यार्थी हे नापास झाले, इतकेच काय तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना शून्य ते एक गुण असे देण्यात आले, जो विद्यार्थी कधीच नापास झाला नाही अश्याही विद्यार्थ्यांना शून्य ते एक गुण मिळाले त्यामुळे विदयार्थ्यांनमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके पेपर तपासले कि नाही तपासले तर मग इतके कमी गुण कसे इतकेच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांनि पुनरमूल्यांकन साठी अर्ज केलेत अश्या विद्यार्थ्यांना सुद्धा भूल थापा विद्यापीठाकडून देण्यात येत आहे.
मग विद्यार्थ्यांनी शिकावे कि नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांनसमोर उद्भवल्यास मोठी चिंता जनक स्थिती समोर उभी झाली. अश्यातच अभाविप नी वारंवार ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आणून दिली दोन हजार दोनसे विद्यार्थ्यांचा डेटा हा विद्यापीठाला उपलब्ध करून दिलाय तरी ही विदयापीठ प्रशासनाने त्यावर लगेच विद्यार्थ्यांना पेपर दाखवू असे अश्वासन महिन्या भरा आधी दिले परंतु त्यावर काम अध्यापही केले नाही.
विद्यापीठ हे खरंच विद्यार्थी केंद्रित आहें काय असा प्रश्न अभाविप विदर्भ प्रेदेश मंत्री शक्ती केराम यांनी विद्यापीठ प्रशासणाला केला आहे.
येत्या आठ दिवसात जर प्रलंबित निकाल लावल्या गेलें नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा त्यावेळी दिला.
निवेदन देती वेळी प्रदेश मंत्री शक्ती केराम, नगर मंत्री अभिलाष कुणघाडर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. अतुल कामडी, भाग संयोजक प्रणय मस्के सह आदी कार्यकर्ता उपस्थित होते.