तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपुरात सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा जागर | Batmi Express

 

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Chandrapur News IN Marathi,

  •  2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे योगदान राहील : सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार
  • साद सह्याद्रीची...भुमी महाराष्ट्राची’ कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन

चंद्रपूरदि.25 : मेरी माटीमेरा देश’ या उपक्रमांतर्गत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात साद सह्याद्रीची...भुमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूरकरांनी उत्साहपूर्ण वातावरणात देशभक्तीचा जागर करत या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले व डोळ्याचे पारणे फिटल्याची भावना व्यक्त केली.

23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.05 वाजता भारताच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान – 3 हे मिशन यशस्वी करून दाखविले. या गोष्टीचा जोश नागरिकांमध्ये होताच. त्यानंतर लगेच सुरू झालेल्या साद सह्याद्रीची...भुमी महाराष्ट्राची’ या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात डौलाने फडकणारा तिरंगा आणि नागरिकांचा उत्साह अभुतपूर्व होता. सांस्कृतिक विभाग (म.रा.)जिल्हा प्रशासनजिल्हा परिषद व चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन चांदा क्लब ग्राऊंडवर करण्यात आले होते.


Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Chandrapur News IN Marathi,
प्रसिध्द अभिनेता श्रेयस तळपदेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पुजा सावंत तसेच प्रसिध्द गायक नंदेश उमप यांच्यासह जवळपास 300 कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यात शिवराज्याभिषेक सोहळाभारतीय स्वातंत्र्याचा लढासंयुक्त महाराष्ट्राचा लढा, वारक-यांच्या वेशातील सादरीकरणदेवीचा जागरअस्सल मराठी नृत्यपोवाडासीमेवरील जवानांच्या वेशातील सादरीकरण अशा विविध नृत्यांनी आसमंत दणाणला. चांद्रयान मोहिमेचे यशवैज्ञानिकांचे परिश्रमाचे फळ आणि देशभक्तीचा जागर असा त्रिवेणी संगम बुधवारी चंद्रपुरात अनुभवायला मिळाला.

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Chandrapur News IN Marathi,


2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे योगदान राहील : पालकमंत्री ना. मुनगंटीवार


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 2023 पासून मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावपातळीपर्यंत हा उपक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सन 2047 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहे. 2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे नक्कीच योगदान राहीलअशी अपेक्षा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

चंद्रपूर: पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया ! 


चांदा क्लब ग्राऊंड येथे साद सह्याद्रीची...भुमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. पुढे ते म्हणालेभारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात आपला देश हा सर्वात प्रथम असला पाहिजे. भयमुक्तभूकमुक्तविषमतामुक्तसमतायुक्त भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. सद्यस्थितीत आपण भद्रावती येथून सीमेवरील आपल्या सैन्यासाठी बॉम्ब पाठवितो. चंद्रपुरात 122 एकर मध्ये असलेल्या सैनिक स्कूलमधून भविष्यात देशाच्या रक्षणासाठी हे सैनिक जातीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले चंद्रपूर नेहमी अग्रेसर असले पाहिजेचंद्रपुरचा गौरव वाढावायासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेअसे आवाहनही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अमृत वाटिकेत वृक्षलागवड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळास "अ" वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दया


तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने साद सह्याद्रीची....भुमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सुभाष नकाशेअभिनेता श्रेयस तळपदेअभिनेत्री पुजा सावंतसोनाली कुलकर्णी आणि गायक नंदेश उमप यांचा ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.