चंद्रपूर: देलनवाडी शेतशिवारात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू तर एक महिला जखमी.! | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Sindewahi,Chandrapur Lightning Strike,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Sindewahi,Chandrapur Lightning Strike,

सिंदेवाही
- सिंदेवाही तालुक्यात दुपार ३ ते ४ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकळासह झालेल्या पावसात देलनवाडी परिसरात शेत शिवारात धान पिकाची रोवणी करण्याकरिता गेलेल्या महीलावर वीज कोसळल्याने दोन महिला ठार तर एक महीला गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली. शेतकरी व मजूर वर्ग धास्तावलेला आहेत. मृतक महीलेचे नाव कल्पना प्रकाश झोडे (४५) व अंजना रुपचंद पुस्तोडे असे आहे तर जखमी महीलेचे नाव सुनिता सुरेश आनंदे ( ३५) असे आहे . जखमी महीलेले सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविले आहे .

सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी शेतशिवारात दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास विज पडून दोन महीलांचा मृत्यू झाल्याची दुःखद  घटना घडली असून सदर महीला देलनवाडीतील आनंदे यांच्या शेतावर रोवणीच्या कामासाठी २० ते २५ महीला गेल्या होत्या . दुपारच्या सुमारास अचानक पणे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाल्याने वातावरणातील बदलामुळे घराकडे जाण्याच्या तयारीत व आश्रय शोधत असतांना तीन महीलावर विज कोसळल्याने दोन महीलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महीला गंभीर जखमी झाली . दुःखद घटनेमुळे कुटुंबावर दुःखा चा डोंगर कोसळला असून मातेच्या मृत्यूमुळे बालके पोरकी झाली आहेत . परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे गावात शोककळा पसरली आहे. 

घटनेची माहीती मिळताच शेतशिवारात गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती . सदर घटनेचा  सिंदेवाही पोलीसांना पंचनामा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून जखमी महीलेवर उपचार सुरु आहे .

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.