ब्रम्हपूरी: किरकोळ वादातून दोन मित्रांनी केला मित्राचा खून | Batmi Express

Bramhapuri Crime,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Today,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी:- किरकोळ वादातून 2 मित्रांनी मिळून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना ब्रम्हपुरी येथे दि. 4 जुलैला रात्री 11 वाजता दरम्यान घडली. सदर घटनेमुळे ब्रम्हपुरी शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ब्रम्हपुरी शहरातील गुजरी वार्ड चौकात 4 जुलै च्या रात्री 11 वाजता दरम्यान मृतक कपील खुशाल भैसारे वय (२२) वर्षे रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी व आरोपी मुन्ना राऊत वय (४५)वर्ष व रोहित भैसारे वय (३२) वर्षे रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी हे तिघेही दारू पिऊन गुजरी वार्ड चौकात बसुन आपआपसात चर्चा करत होते. या चर्चेचा रुपांतर कपील सोबत वादात झाले. आणि मुन्ना राऊत यांचा राग अनावर झाला नाही आणि त्यांच्या कडे असलेल्या धारधार चाकुने कपील भैसारे च्या छातीवर दोन- तिन वार केला. व तिथून पळून गेला. काही वेळात कपील भैसारे याचा भाऊ फिरायला बाहेर आला असता कपील हा खाली रक्ताच्या थारोळ्यात पडुन दिसला त्यांने गंभीर जखमी अवस्थेत कपील भैसारे ला ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले.

घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना देण्यात आली. त्या अनुषंगाने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. ब्रम्हपुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज पहाटे सुमारास नागभीड पोलीस स्टेशन मधून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपींविरोधात कलम 302,34 भादवी अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा 3,2,वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.