महाराष्ट्र MHT CET चा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? | Batmi Express

Education,MHT CET 2023,MHT CET 2023 Result,MHT CET Result,MHT-CET exam,MHT-CET 2023,

MHT CET 2023,MHT CET 2023 Result,MHT CET Result,MHT-CET exam,MHT-CET 2023,

 मुंबई:- MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. (Maharashtra MHT CET 2023 Result Today; Where and how to watch?)

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी निकाल जाहीर करेल. निकाल MHT CET 2023 च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org वर तपासता येतील. पीसीएम ग्रुपसाठी MHT CET 2023 परीक्षा 9 ते 14 मे आणि पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे दरम्यान घेण्यात आली. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या वर्षी एकूण 4.6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

MHT CET निकाल थेट Exam Helper वर तपासता येईल:

🕶️ MHT CET Result - (PCM Group) 2023

Link :

https://examhelper.batmiexpress.com/p/mht-cet-result-pcm-group-2023.html

🕶️ MHT CET Result - (PCB Group) 2023

Link :

https://examhelper.batmiexpress.com/p/mht-cet-result-pcb-group-2023.html


MHT CET 2023 चा निकाल कसा तपासायचा:

  • सर्वप्रथम cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाइटच्या होम पेजवर portal links च्या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर Check MHT CET Result 2023 च्या लिंकवर जा.
  • आता रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉगिन करा.
  • निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

MHT CET 2023 चा निकाल जाहीर झाल्यानंतर काउन्सलिंग केलं जाईल. याद्वारे इंजीनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. काउन्सलिंग सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. यंदा अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. यंदा पहिल्यांदाच मोबाईल ॲपमार्फत उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती मिळणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.