चंद्रपूर : ग्रामीण भागातील युवकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास प्रशिक्षण | Batmi Express

Rojgar,Chandrapur News,Chandrapur,career,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,Rojgar,career,

 

  • शासन आपल्या दारी 
  • ग्रामीण भागातील युवकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास प्रशिक्षण
  • युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी ग्रा.पं.कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 08 :  कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा. युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात. तसेच ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर कमी करण्याच्या हेतुने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात कौशल्य विकास केंद्र सुरू करावयाचे आहे. जेणेकरून, ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध होईल.

यादृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीमध्ये, बल्लारपूर-कोठारी, भद्रावती-चंदनखेडा, ब्रह्मपुरी- पिंपळगाव, चंद्रपूर-मोरवा, चिमूर-नेरी, गोंडपिपरी-भंगाराम तळोधी, जिवती-शेनगाव, कोरपना-बिबी, मुल-राजोली, नागभीड-तळोधी (बाळापुर), पोंभुर्णा-देवाडा, राजुरा- विरूर, सावली- व्याहाड खुर्द, सिंदेवाही-नवरगाव, तसेच वरोरा-शेगाव या ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

सदर ग्रामपंचायत भागातील युवकांना कौशल्य विकास केंद्रामार्फत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्याकरीता ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.