चंद्रपूर: DJ च्या वादातून रामसेतू पुलावर भयंकर हत्याकांड; एकाची हत्या | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Pombhurna,Chandrapur Crime,Chandrapur Murder,Chandrapur Murdered,Chandrapur Crime News,

Chandrapur News,Chandrapur,Pombhurna,Chandrapur Crime,Chandrapur  Murder,Chandrapur   Murdered,Chandrapur Crime News,

चंद्रपूर
:- लग्नाच्या वरातीत डीजे वरून झालेल्या वादात एका मुलाला बेदम मारहाण करताना त्याचे वडील सोडवायला गेले असता मारेकऱ्यांनी लोखंडी वस्तू ने त्याच्या वडिलावर वार केला यात वडीलाची चा मृत्यू झाल्याची खलबळजनक घटना चंद्रपूर शहरातील श्री. रामसेतू उडाणपूलावर घडली.

किशोर नत्थुजी पिंपळकर वय 48 वर्ष, राहणार तिरवंजा, ता. भद्रावती असे मृतकाचे नाव असून ओम किशोर पिंपळकर वय 18 वर्ष, रा. तिरवंजा, ता. भद्रावती असे जखमी मुलाचे नाव आहे.

दिनांक 15 जून 2023 रोजी बाबूपेठ येथील संदिप पिंपळकर यांचा लग्न सोहळा दाताला मार्गावरील शोमॅन सेलिब्रेशन या ठिकाणी होता. वरातीत डिजे च्या तालावर नाचताना ओम पिंपळकर या युवकाशी वरतीतील काही अज्ञात मुलांचा वाद झाला. लग्न सोहळा आटोपल्यावर अज्ञात युवकांनी ओम पिंपळकर याला रामसेतू उड्डाणपूलावर अडवून मारहाण करणे सुरू केले याची माहिती ओम चे वडील किशोर पिंपळकर यांना मिळताच ते भांडण सोडवायला गेले असता अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचे डोक्यावर लोखंडी वस्तू ने जबर मारहाण केली यात किशोर पिंपळकर खाली कोसळले दरम्यान मारेकऱ्यांनी पळ काढला.

जखमी अवस्थेत किशोर पिंपळकर व ओम पिंपळकर यांच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु किशोर पिंपळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने नागपूर हलविण्यात आले परंतु मार्गतच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कलम अन्वे 302, 307, 324, 646, 142, 447, 148 गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी स्वप्नील गोपाले करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.