सावली: प्रेमिला मुखरु रोहणकर वय 53 वर्ष रा. वाघोली बुटी ता. सावली जिल्हा चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मृतक महीला सकाळी शेतात मजूर म्हणूण कामासाठी गेली असता दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला व तीला ठार केले. या घटनेची माहिती कळताच सावली वनविभागाचे पथक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वाघोली बुटी येथे मागच्याच महिन्यात एका महिलेचा वाघाने ठार केल्यानंतर ही त्याच गावातील दुसरी घटना आहे. सावली तालुक्यात आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात पन्नास पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. तरीही यावर काही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीं आहे. यामुळेच हे हल्ले अजून वाढतच आहे. या घटनामुळे सावली तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.