मुलचेरा: चार महिन्यांपूर्वी लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर संसार फुलायला सुरुवातही झाली होती. मात्र पतीच्या डोक्यात संशयाचे भूत शिरल्याने पतीने पत्नीची विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे उघडकीस आली आहे.
विशेष म्हणजे, आरोपीने पत्नीने आत्महत्या केल्याचा कट रचून पोलिसांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणाचा उलगडा लावून आरोपी पतीस अटक केली. खुशी महानंद सरकार असे मृतक पत्नीचे तर महानंद सरकार असे आरोपी पतीचे नाव आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. अशातच 29 एप्रिल रोजी महानंदने मुलचेरा पोलिस ठाण्यात पत्नी खुशी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरू केला. घटनेच्या दोन दिवसानंतर महानंदने पोलिस ठाण्यात पोहोचून त्याच्याच शेतात पत्नी खुशींचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मुलचेरा पोलिसांनी या प्रकरणाचा गंभीरतेने तपास करून आरोपीला पकडण्यासाठी ठाणेदार अशोक भापकर यांनी एक पथक तयार केले तपासाअंती खुशी हत्या तिचा पत महानंदनेच केल्याचे निष्पन्न झाले यावरून पोलिसांनी महानंद विरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाख करून अटक केली. पोलिसांनी आपल्या हिसका दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.