'
30 seconds remaining
Skip Ad >

Breaking! नागपूर : धावत्या शिवशाहीला पाहता पाहता आग, शिवशाही जळून खाक | Batmi Express

0

Nagpur,nagpur news,Nagpur Today,Nagpur LIve,Nagpur LIve News,Nagpur  Bus,

नागपूर :  
नागपूरवरुन अमरावतीकडे जाणाऱ्या शिवशाही बसला कोंढाळी जवळ अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये १६ प्रवासी प्रवास करीत होते. बसचालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून प्रवाशांना सूचित करत सुखरूप बाहेर काढल्याने त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची माहिती असून यात बस पूर्णत: जळून खाक झाली आहे.

माहितीनुसार आज ४ एप्रिल २०२३ ला सकाळी ९:०० च्या सुमारास शिवशाही बस नागपूरहुन अमरावतीकडे निघाली. दरम्यान कोंढाळी नजीकच्या साईबाबा मंदिराजवळून जात असताना बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करून वाहक व प्रवाशांना सूचना केली. यावेळी बसमध्ये १६ प्रवासी प्रवास करीत होते. चालकाने माहिती देताच सर्व प्रवासी वेळीच आपले सामान घेऊन बसच्या बाहेर पडले. पाहता पाहता बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले व क्षणात आगीने उग्र रुप धारण केले.

सदर घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिस अग्निशमन दलाच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटीने पुढच्या प्रवासाला पाठविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×