ब्रम्हपुरी: बीड (Beed) जिल्ह्यातील कामगार पाणी पुरवठा विभागाच्या कामासाठी बेलगाव येथे असतांना महिलेला बघितले या कारणासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य व त्यांचा सहकाऱ्यांनी कामगाराला ट्रॅक्टर ला बांधून कोयता दाखवून, अंगावर डिझेल, पेट्रोल टाकून जीवानिशी मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाण केल्या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट भागवत जगताप रा. श्रृंगारवाडी जिल्हा-बीड यांच्याकडे असून त्यांच्याच कामावर सदर मजुर बेलगाव येथे काम करीत आहे. कामावरील मजुराने गावातील एका महिलेकडे बघितल्याने काही नागरिकांनी व बेलगाव येथील दिनेश काशिनाथ अवसरे,निलेश काशिनाथ अवसरे, गणेश काशिनाथ अवसरे यांचा समावेश होता. मजुराला चामड्याच्या बेल्टने अमानवीय मारहाण करण्यात आली. तर एका जवळ धारदार कोयता होता.सदर प्रकरणाची माहिती ब्रम्हपुरी पोलीसांना देण्यात आली.मात्र कुणीही तक्रार करण्यास तयार नसल्याचे पोलीस निरीक्षक आंबोरे यांच्याकडून माहिती देण्यात आली.सदर प्रकरण सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होताच प्रशासन खळबळून जागे झाले.
कंत्राटदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविताच बेलगाव येथील दिनेश काशिनाथ अवसरे,निलेश काशिनाथ अवसरे,गणेश काशिनाथ अवसरे यांच्यावर कलम ३९४, ३४२,३५२, ३२३,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.