गडचिरोली: पोलिसांनी जप्त केला 7 लाखांचा मुद्देमाल | Batmi Express

Be
0

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Crime,Gadchiroli Batmya,

गडचिरोली
:  प्राप्त झालेल्या गोपनिय मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा रचून कारवाई करीत दारु व वाहनासह 6,96,600 रुपयांचा मुद्देमाल गडचिरोली पोलिसांनी जप्त केला.

प्राप्त माहितीनुसार, चंपूर-आलापल्ली-आष्टी मार्गावर वाहन क्र. एमएच 02 बीपी 3983 या कारमधून देशी/विदेशी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून आष्टी येथील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचून मार्कंडा कंसोबा फाट्याजवळ सदर वाहनाला थांबवून तपासणी केली.

दरम्यान, यामध्ये 500 मीली मापाचे हायवर्ड 5000 कंपनीचे बियर टिन किंमत अंदाजे 54,000, 2 लिटर क्षमतेचे रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारू किंमत 45,000, 90 मीली मापाचे रॉकेट संत्रा देशी दारु किंमत 40,000, 750 मीली मापाचे इम्पेरियल ब्ल्यू कंपनीची विदेशी दारु किंमत 28,800 रुपये, 375 मीली मापाचे इंम्पेरियल ब्ल्यु कंपनीची दारु किंमत 14,400 रुपये, 180 मीली तापाच्या रॉयल स्टॅग कंपनीचे विदेशी दारु किंमत 14,400 रुपये असे एकूण 1,96,600 रुपयांची दारु व वाहन किंमत 5,00000 रुपये असा एकूण 6,96,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर वाहन चंद्रपूर (बाबूपेठ) येथील कोमल रतन निमगडे यांचे असून त्यांच्याविरुद्ध आष्टी पोलिसांत अप. क्र. 71/2023 कलम 65 (अ) म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्वल, अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात आष्टी येथील पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, गणेश जंगले, ज्ञानेश्‍वर मस्के, तोडासे, रायसिडाम, तिमाडे आणि मेश्राम यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->