दहावी, बारावीत आता मोठा बदल होणार आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणार्या तज्ज्ञ समितीने असे अनेक बदल सुचवले आहे. त्यामुळे हे बदल झाल्यास परीक्षेचे स्वरूप अन् बरेच काही बदलणार आहे. हे सर्व बदल पुढील वर्षापासून लागू होणार आहेत, असे एनसीएफचे अध्यक्ष डॉ.कस्तुरीरंगन यांनी सांगितले.
बोर्ड परीक्षा आता दोन टप्प्यांत घेण्यात येणार. १०वी-१२वीच्या निकालात आधीच्या वर्गातील गुण जोडण्याची शिफारस आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे विभाजनही संपुष्टात येणार.
तसेच बारावी बोर्ड परीक्षा देताना 16 विविध अभ्यासक्रमांचे कोर्स असणार, त्यामुळे विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडू शकणार.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.