बल्लारपूर (Ballarpur) : मुल तालुक्यातील राजोली येथे दारुड्या बापाने गळा दाबून मुलाची केली हत्या.(Murder by strangulation) स्वतः च्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न सुध्दा केला.
राजोली येथील गणेश विठ्ठल चौधरी वय ३१ वर्ष हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राहात होता. हनुमान जयंतीच्या दिवशी तो दारु पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघुन गेली होती. घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहात होता. दरम्यान आज पहाटे 5 वाजता च्या दरम्यान त्याने दारुच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबुन खुन केला आणि स्वतः च्या गळ्यावर चाकुने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दारूच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाचा गळा दाबुन खुन (Murder by strangulation) केल्यानंतर स्वतः च्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
प्रियांशु गणेश चौधरी वय ३ वर्ष असे गळा दाबुन खुन केलेल्या बालकाचे नांव आहे. तर गणेश विठ्ठल चौधरी वय ३१ वर्ष असे पित्याचे नांव आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच सदर घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन पंचनामा केला असुन जखमी गणेश चौधरी याला उपचारार्थ मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.