कोटरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli  Live News,Gadchiroli live,

कोटरा
:-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखा कोटरा च्या पुढाकाराने विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कार्यालय कोटरा येथील माजी सरपंच तुलारामजी मडावी होते .

प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ,पुणे (बार्टी) चे समता दूत जयलालजी सिन्द्राम तर प्रमुख अतिथी म्हणून मुकेश हरडे, हेमंत उईके, यशवंत सहारे, मदन सहारे, रमेश शहारे, मदिना चौरे, डॉक्टर तापस दास, संदीप चौरे, परमेश्वर  गायकवाड, विनोद चौरे, बकाराम उईके, मोतीराम मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

         उपस्थित मान्यवरांनी महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून माल्यार्पन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष तुलारामजी मडावी यांचे हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी

भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

बार्टीचे समता दूत जयलालजी सिंद्राम यांनी बार्टी मार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजना उपस्थित सर्व समाज बांधवांना समजावून सांगितले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय विलास जी गावंडे यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर विस्तृत असे मार्गदर्शन समाज बांधवांना केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तुलारामजी मडावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर सखोल मार्गदर्शन करून सर्व समाजाने एकत्र येऊन समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश हरडे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन रमेश शहारे व आभार प्रदर्शन विनोद चौरे यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखा कोटराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->